पारोळा तालुक्यात वाघरे गावाजवळ घटना, तरुण ठार, १० जखमी
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यात भडगाव-पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ आज बुधवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास एसटी बस आणि खासगी टेम्पोची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. हा अपघात दोन्ही वाहन चालकाने वळण रस्त्यावर वेगाने वाहन चालविल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव आगाराची बस (एमएच १४ बीटी १९८४) हि सोयगावहून धुळ्याकडे रात्री निघाली होती. पारोळा तालुक्यात वाघरे गावाजवळ समोरून येणाऱ्या खासगी टेम्पो (क्र. एमएच १९सीवाय १६०६) या वाहनाशी जोरदार धडकली. या धडकेनंतर बसमधील आणि टेम्पोमधील अनेक प्रवासी जखमी झाले.(केसीएन)या भीषण अपघातात पंकज पाटील (वय ३०, रा. उंदीरखेडा ता. पारोळा) यांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातातील जखमींना तातडीने पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे ५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चालक विनोद लक्ष्मण पाटील आणि वाहक दिनकर पुंडलीक लवटे हे जखमी झाले आहे.
अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहने दाबली गेली असून नुकसान झाले आहे. बसमध्ये एकूण ६९ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात मिराबाई पंढरी सोनवणे (वय ५५, रा. सोयगाव), निलाबाई घनश्याम क्षीरसागर (वय ७५, रा. धुळे), अंजनाबाई रघुनाथ पाटील (वय ७०, रा. हनुमंतखेडा), मनोहर सजन पाटील (वय ६०, रा. चोरवड), रमेश धोंडू चौधरी (वय ८०, रा. भडगाव), मीराबाई रघुनाथ पाटील (वय ८०, धुळे) आणि जान्हवी संतोष मोरे (वय १९, रा. धुळे), रघुनाथ गणपंत सोनवणे (ढेकू) जखमी झाले असून या जखमींवर पारोळा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(केसीएन)हे देखील या अपघातात जखमी झाले. तर काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नसून अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. अपघातस्थळी दिलीप गुलाब बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी यांचेसह आगार व्यवस्थापक प्रमोद बी. चौधरी, वाहतूक निरीक्षक अनिकेत न्हायदे यांनी भेट दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनेची पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.