एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील घटना
गोपाल महाजन याच्या पश्चात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. गोपाल हा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी होता. भाऊसाहेब आत्माराम महाजन यांचा तो मुलगा होता. सदर घटनेबाबत कासोदा पोलीस स्टेशन येथे सुभाष लक्ष्मण महाजन यांनी खबर दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोपाल महाजन याचे एरंडोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. एपीआय निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल अकिल मुजावर पुढील तपास करत आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.