• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य सरकारची काढली प्रतीकात्मक तिरडी, शासन चालवणारे कारभारी संवेदनशून्य असल्याचा आरोप !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 11, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेतर्फे सभासदांना १० टक्के लाभांश

जळगावात शिवसेना ठाकरे पक्षाचा जनआक्रोश मोर्चा

जळगाव ( प्रतिनिधी ) – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. हा मोर्चा शिवतीर्थ मैदान ते जिल्हाअधिकारी कार्यलयापर्यंत निघाला. मोर्चांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

मोर्चेच्या अग्रभागी सजविलेल्या तीन वेगवेगळ्या ट्रॅक्टरमध्ये संजय गायकवाड, संजय शिरसाट व माणिकराव कोकाटे यांचा मुखवटा परिधान केलेले कार्यकर्ते होते. त्यांच्या नंतर सरकारची प्रतीकात्मक तिरडी घेऊन कार्यकर्ते हे “राजीनामा द्या राजीनामा द्या” अशा घोषणा देत सहभागी झाले होते.

यावेळी सरकारविरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी खासदार उन्मेष पाटील, लोकसभाक्षेत्र प्रमुख करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, प्रशांत सुरळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यलयासमोर करण्यात आली. याप्रसंगी भाषणे झालीत. हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधातील  असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय सावंत म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात आज महामोर्चा काढण्यात येत आहे. याच अनुषंगानने जळगावात देखील जिल्हाकधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात जनमानसांचा आवाज ज्यात शेतकरी, महिला भगिनी असतील या सर्वांची फसवणूक होत आहे. सरकार भ्रष्ट मंत्र्यांना घेऊन गेंड्याचे कातडीचे झाले आहे. ते जागेवर यायला हवे यासाठी शिवसेनेतर्फे राज्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

सरकारमधील मोठा वाटा हा भाजपचा आहे, भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे, आरोप केलेल्या मंत्र्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. यापूर्वी मंत्र्यांना आधी जेल मध्ये जाण्याची भीती असायची पण ती आता राहिलेली नाही. भ्रष्ट्राचारचे आरोप केलेले मंत्री भाजपमध्ये गेल्यानंतर ते पवित्र होत असतात असा आरोप संजय सावंत यांनी केला आहे. यासाठी सरकारची प्रतीकात्मकरित्या अंत्ययात्रा काढली आहे, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले.

याप्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, उपमहागर प्रमुख नेता सांगोळे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाहीर पठाण, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, कुसुंबा उपसरपंच प्रमोद घुगे, धरणगाव माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, फिरोज पठाण, शोएब खाटीक, किरण भावसार, निलेश ठाकरे, बाळा कणखरे, विजय बांदल, राहुल पार्क ,विजय राठोड, जैनुद्दीन शेख, लखन सांगळे, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, पप्पू तायडे, राकेश माळी, बिरजू शिरसाठ, शरद पाटील, गोलू पाराये, राहुल खवडे, भगवान धनगर, गुलाबराव कांबळे, सचिन चौधरी छगन खडसे, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, लोटन सोनवणे, प्रभाकर कोळी, योगेश चौधरी, आबा कोळी, राकेश घुगे, विनायक धर्माधिकारी, राजू जगताप, भीमराव पांडव आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी केले तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.


 

 

Tags: ubt shivsena news
Previous Post

शूर जवान स्वप्निल सोनवणे  कर्तव्य बजावत असताना शहिद

Next Post

शेतकऱ्यांसह पशुपालकांनी शेतात जाताना काळजी घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकऱ्यांसह पशुपालकांनी शेतात जाताना काळजी घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांसह पशुपालकांनी शेतात जाताना काळजी घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon