जळगाव शहरात अजिंठा चौकात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील अजिंठा चौकात डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे व्यापारी जखमी झाले होते. त्यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, मृत्यूपश्चात त्यांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्याने नेत्रदानाची प्रक्रिया करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश गोविंद चंदनकर (५२, रा. शिवकॉलनी) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. चंदनकर यांची एमआयडीसी परिसरात कंपनी असून १ ऑगस्ट रोजी ते कंपनीत जात होते.(केसीएन)त्या वेळी अजिंठा चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली व त्यांच्या पायावरून चाक गेले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी ४ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले. योगेश वाणी हे काथारवाणी समाजाचे माजी अध्यक्ष होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.