जळगाव रेल्वे स्थानकावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जळगाव स्थानकावर मंगला एक्सप्रेस ही रेल्वे हळू झाल्याने उतरण्याच्या प्रयत्नात असताना डाेक्यावर पडल्याने महिला वकील ॲड. वर्षा साहेबराव बिऱ्हाडे या गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ घडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरातील भाेईटे नगरात ॲड. वर्षा बिऱ्हाडे (वय ४०) या आई-वडील, भाऊ, बहिण व मुलगा यांच्यासह राहतात. जळगाव व कल्याण येथे वकिलीची प्रॅक्टीस करत हाेत्या. त्या गुरुवारी मुंबईहून मंगला एक्सप्रेसने येत हाेत्या.(केसीएन)दरम्यान मंगला एक्सप्रेसला जळगावला थांबा नसल्याने जळगाव स्थानकावरून रेल्वे हळू जात असताना काही प्रवाशी चालत्या रेल्वेतून उतरले. त्यांचे पाहून ॲड. बिऱ्हाडे ह्या देखील उतरत असताना त्यांचा ताेल जावून त्या फलाट क्रमांक ३ वर डाेक्यावर पडल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी दि. १ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एवढे कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. त्यांच्या मृत्यूमुळे जळगाव शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी रेल्वे पाेलिसात अकस्मात मृत्यूची नाेंद झाली आहे.