गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशन तर्फे ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक रविवार दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाळधी येथील चांदसर रस्त्यावर असलेल्या सुगोकी लॉन्स येथे पार पडणार आहे. यावेळी गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे एकता परिवारातर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा यासाठी विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच तिसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मालपाणी ग्रुपचे चेअरमन राजेश ओंकारनाथ मालपाणी हे उपस्थित राहणार आहेत.
सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित द्यावी असे आवाहन एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप जैन, सचिव शांतीलाल नावरकर यांनी केले आहे.