धरणगाव तालुक्यात महायुतीचा उत्साह
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव तालुक्यातील चमगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाला साथ देण्यासाठी हा प्रवेश केल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे पश्चिम जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवी पलांडे वाघ, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष पी.सी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चमगाव येथील कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये भाऊसाहेब सावंत, गजानन सावंत, माजी सरपंच निर्दोष पवार, वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितीन पाटील, पाळधी मंडळ अध्यक्ष किशोर झंवर, प्रवीण पाटील, महेश विसावे, संजय शिरसाट आदींचा समावेश होता. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नामदेवराव सावंत, नवल सावंत, वासुदेव सावंत, लोटन सावंत, कैलास सावंत, प्रकाश पाटील, सुदाम सावंत, चत्रू सावंत, अशोक सावंत, पुंजू सावंत, हरचंद भिल, मनीष पवार, समाधान भिल, गोरख भिल, जितेंद्र भिल, रवींद्र कोळी, बंधन कोळी, दगडू भिल, लहु भिल, वसंतराव पाटील, प्रवीण पाटील, विजय सावंत, अतुल पाटील, नितीन सावंत, भगवान पाटील, भगवान सावंत यांनी प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे चमगाव परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे, तर भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.