चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- पाव विक्रीसाठी जाणार्या सायकलला मागून चारचाकी वाहनाने जोरदारपणे धडक दिली. त्यात सायकलस्वार रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्यात जबर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. १२ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान रांजणगाव येथे घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहम्मद सैहनूर खान आणि जावेद अन्वार खान हे दि. १२ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास रांजणगाव गावी पाव विक्रीसाठी सायकलने जात होते. चारचाकी (एमपी०९/एएच-२७३३) वरील चालक अक्षय सुभाष ससाने (देवास नाका, इंदौर, मध्यप्रदेश) याने वाहन भरधाव वेगात चालवून सायकलवर पाव विक्रीसाठी जाणारे जावेद अन्वर खान (वय ३६, रा. चाळीसगाव) यांच्या सायकलला मागून धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.