पाचोरा शहरात बंडू सोनार यांचा उपक्रम
पाचोरा (प्रतिनिधी) :- “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या संकल्पनेखाली पाचोरा शहरात मलेरिया मुक्तीची सुरुवात करण्यात आली आहे. शहरात सध्या पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रोगजंतू आणि मलेरिया सारख्या आजारांचा धोका अधिकच वाढला आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी पाचोरा नगरपालिकेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
आमदार किशोर पाटील यांच्या प्रेरणेने, तसेच जनसेवक बंडूभाऊ सोनार यांच्या सूचनेनुसार, प्रभाग क्रमांक ८ मध्ये मलेरियानाशक लिक्विड औषधाची फवारणी मोहिमेची सुरुवात झाली आहे. या उपक्रमासाठी मुख्याधिकारी व प्रशासक मंगेश देवरे,आरोग्य निरीक्षक नकवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने विशेष मोहीम राबवली. शहरातील सांडपाणी, साचलेले डबके, पावसामुळे तयार झालेल्या पाण्याच्या ठिकाणी मलेरिया नाशक औषध टाकले जात आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ८ मधून याची सुरुवात करण्यात आली.या मोहिमेत जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी केली आणि मार्गदर्शन केलं.
“माझा प्रभाग, माझी जबाबदारी” या भावनेतून प्रभागातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होणं आवश्यक आहे. आपल्या घराजवळ, कॉलनीमध्ये सांडपाण्याचे डबके, अथवा साचलेले पाणी दिसल्यास – कृपया थांबू नका. ताबडतोब नंबरवर संपर्क साधा. मो. 9158509318 – बंडूभाऊ केशव सोनार यांचा थेट नंबर
आपला मोबाईल नंबर व कॉलनीचा पत्ता यासह माहिती द्या, आपल्या परिसरातही काम होईल याची खात्री दिली जाईल.चालक सनी बागरे, कर्मचारी महेश खैरनार, विलास चनाल ही टीम कार्यरत होती. नगरपालिकेच्या पथकाने चिकाटीने, जबाबदारीने हे काम हाती घेतले. “मलेरिया मुक्त पाचोरा” हा आपला सामूहिक संकल्प आहे. प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन मदत केली, तर आपला प्रभागच नव्हे तर संपूर्ण पाचोरा रोगमुक्त होईल, सुरक्षित होईल. माझा प्रभाग, माझी जबाबदारी – चला, आरोग्यदूत बना असे आवाहन बंडू सोनार यांनी केले आहे.