जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये रूग्ण सुरक्षाअंतर्गत सुरक्षित इंजेक्शन सरावावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नर्सिंगच्या विदयार्थ्यांना सुरक्षित सुई वापर, हात स्वच्छता, नीडल स्टिक इजा प्रतिबंध, आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय तसेच गोदावरी नर्सिंगच्या प्रा. प्रियंका गाडेकर, प्रा. सुमैया शेख,प्रा सचिन पवार यांनी प्रात्यक्षीकव्दारे मार्गदर्शन केले. याचबरोबर वरील विषयास अनुसरून विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण, भूमिका आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.वन निडल,वन सिंरींज ओन्ली वन टाईम या घोषवाक्यास अनुसरून इंजेक्शनचा एकदाच उपयोग करावा,रूग्णांना इंजेक्शन दयायच्या आधी व नंतर लक्षात ठेवायच्या विविध सुचना यावेळी प्रा. प्रियंका यांनी केल्यात.