बारी समाज विद्यालयाचा उपक्रम
शिरसोली (वार्ताहर) :- माध्यमिक विद्या शिक्षण मंडळ, शिरसोली संचलित बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त गावातून दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पताका हाती घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करत, पारंपरिक वेशभूषा धारण करून अतिशय भक्तिमय वातावरणात सहभाग घेतला.
दिंडीचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाल बारी, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, परीक्षा प्रमुख दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत कुमावत, कांचन धांडे, मनीषा अस्वार, मनीषा पायघन , क्रीडा शिक्षक संजय काटोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये गोल रिंगण साकारले व तेथे विठ्ठलाच्या जयघोषाने पारंपारिक पद्धतीने दिंडी गावात निघाली. गावात संस्थेचे चेअरमन अर्जुन काटोले, सचिव सुरेश अस्वार, संचालक मनोज बारी, संचालक शशिकांत वाणी, राजेंद्र आंबटकर, संजय ताडे, “केसरीराज”चे संपादक तथा सोनार समाजाचे शिरसोलीचे अध्यक्ष भगवान सोनार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर दिंडीसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.