एकमेव अर्ज आल्याने झाले बिनविरोध विजयी
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यात सामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेंद्र मोतीलाल साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच संगीता भोलेनाथ भिल होत्या. मावळते उपसरपंच पूनम राजेंद्र साळुंखे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड करण्यात आली. एकमेव अर्ज असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पाटील, रविंद्र साळुंखे, पूनम साळुंखे, मालुबाई पाटील, मनिषा पाटील उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले. यावेळी भोलेनाथ भील, साहेबराव पाटील, भालचंद्र चव्हाण, राजेंद्र साळुंखे, मुकेश सोनकूळ, यशोदीप पाटील, सुनील साळुंखे, प्रशांत साळुंखे, प्रमोद पाटील, बाळकृष्ण साळुंखे, शिवाजी चव्हाण, मकरंद पाटील, प्रशांत सूर्यवंशी, ऋषिकेश नेरपगार यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्या निवडीबद्दल तुळजाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डी.एम.पाटील यांनी अभिनंदन केले.