चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सन्मान
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असणाऱ्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणीबाणीविरोधात संघर्ष करत प्रसंगी कारावास भोगणारे चाळीसगाव तालुक्यातील जेष्ठ सेनानी तसेच व दिवंगत असलेले सेनानी यांच्या कुटुंबीयांचा सत्कार भाजपा चाळीसगाव शहर मंडळातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित या कार्यक्रमात संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करणारे सेनानी स्व.डॉ.वा.ग पूर्णपात्रे यांचे नातू डॉ. सत्यजितजी पूर्णपात्रे (चाळीसगाव), स्व.शिवाजी दत्तात्रय पालवे चाळीसगाव यांचे चिरंजीव प्रशांत शिवाजी पालवे (चाळीसगाव), स्व.जगन्नाथ गोबन राठोड यांचे चिरंजीव मच्छिन्द्र राठोड (वलठाण), स्व.सुखलाल मराठे यांचे चिरंजीव यशवंत मराठे (चाळीसगाव), रंगराव बालाजी साबळे (करजगाव), दिलीप लक्ष्मणराव गवळी (चाळीसगाव), पंडित रामचंद्र स्वार यांचे नातू सचिन स्वार (चाळीसगाव), स्व. नागो वस्ताद महानुभाव यांची नात सुवर्णा अशोक महानुभाव, श्री.चंद्रकांत विश्वनाथ फासे यांचे नातू योगेश फासे, दिनकर देविदास देव यांचे पुतणे मिलिंद देव यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी व कुटुंबीयांनी भोगलेल्या यातना, देशावर कोसळलेल संकट, संविधान व नितीमूल्यांची झालेली हत्या याविषयी आपले अनुभव व्यक्त केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील संवाद साधत सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.