पारोळा शहरात रात्रीची घटना
भूषण सुभाष चौधरी (वय ३२, रा. स्वामीनारायण नगर, पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा यांच्यासह राहत होता.(केसीएन)दरम्यान, रविवारी तो घरी एकटाच होता. रात्री त्याने राहत्या घरात गळफास लावून घेत स्वतःची जीवनयात्रा संपविली. कुटुंबीय घरी आले तेव्हा घटना उघड झाली. त्याला तत्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
यावेळी कुटुंबियांना मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे पारोळा शहरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.