हातगाव, पिंपळवाड येथेही चोरी, पोलिसांपुढे आव्हान
चाळीसगाव ( प्रतिनिधी) :- तालुक्यातील अंधारी येथे चोरटयांनी मोटार सायकलवर येवुन मुख्य दरवाजाची कुलुप तोडुन, बेडरुम मधील लोखंडी कपाटाची कडी उचकावुन त्यातील लॉकर मध्ये ठेवलेले रोख रक्कम व सोन्याची दागिने असा एकूण ३ लाख ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. तर तालुक्यातील हातगाव, पिंपळवाड येथे ही चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत घरफोडी केली आहे. हि घटना दि.४ रोजी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
रावसाहेब लक्ष्मण त्रिभुवन (वय ६१ वर्षे, रा.अंधारी ता. चाळीसगाव) हे दि.३ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नातीला बरे वाटत नसल्याने, तिला उपचारासाठी चाळीसगाव येथे घेवुन आले होते. याच संधीचा फायदा घेत, अज्ञात चोरट्यांनी दि.४ रोजी मध्यरात्री त्याच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. (केसीएन)घरातील बेडरुम मध्ये लोखंडी कपाटाची कडी उचकावुन लोखंडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले रोख रुपये व दागिने असा एकुण ३,४७,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. त्रिभुवन यांच्या घरासमोर एका मोटार सायकलवर सफेद शर्ट व काळी पॅन्ट घातलेला अनोळखी इसम मोटार सायकलवर बसलेला दिसला.
तसेच घरातुन तिन अनोळखी इसम बाहेर पडताना शेजारच्यांना दिसले. दुसऱ्या घटनेत हातगाव येथील सुदाम मोतीराम चकोर यांच्या घरी देखील दरवाजाची कड़ी तोडुन रात्री चोरी झाली आहे. तसेच पिंपळवाड निकुंभ येथील सोमनाथ पुंजाराम उगले व बाळु भिकाजी लोधे यांच्या देखील घराच्या दरवाजाच्या कुलुप व कड़ी तोडुन त्यांच्या देखील घरात रात्रीचे चोरी झाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. सततच्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहे.