आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या रावेर कार्यकारिणीचे गठन
रावेर (प्रतिनिधी) :- आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या रावेर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड आज, शुक्रवार दि. ६ जून रोजी रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस येथे सकाळी ११ वाजता पार पडली. केंद्रीय सरचिटणीस प्रकाशजी सरदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंबेडकरी फोरमचे जिल्हाध्यक्ष दिनेश ईखारे हे देखील उपस्थित होते.
या निवडीमध्ये बाळु शिरतुरे यांची रावेर तालुकाध्यक्षपदी तर प्रशांत गाढे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्षपदी प्रशांत सवर्णे, प्रसिद्धी प्रमुखपदी विनायक जव्हुरे, संघटकपदी दिनेश सैगमिरे, प्रदीप कोचुरे, प्रमोद गायकवाड, रुपेश इंगळे, उमेश तायडे, शालीक सवर्णे, विजय शामराव अवसरमल, विजय काशिनाथ अवसरमल, योगेंद्र भालेराव, जितेंद्र साबळे, आणि राजेंद्र वाघ यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमचे महाराष्ट्र संघटक राजेंद्र अटकाळे, महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख राहुल गाढे, जिल्हा उपाध्यक्ष नगिनदास इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष कोसोदे, जिल्हा संघटक सचिव कांतीलाल गाढे आणि जिल्हा संघटक प्रवीण धुंदले हे उपस्थित होते. या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.