जळगाव जिल्हा परिषदेत सीईओंकडून मान्यता
या निर्णयाअंतर्गत एकूण ६८ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ लेखी आदेशाद्वारे प्रदान करण्यात आला आहे. या लाभार्थी कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यामध्ये १७ दिवंगत कर्मचारी यांचा सहभाग आहे.
हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांना दिलेले समर्थन असून, यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.या निर्णयामुळे ६८ कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभत वाढ होणार आहे.