बोदवड तालुक्यातील मनुर खुर्द येथील घटना
बोदवड ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मनूर खुर्द येथील नवविवाहित महिलेने गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे तिची अवघ्या दोन महिन्यांची मुलगी पोरकी झाली आहे.
स्वाती नितीन कोळी (वय २०) असे या आईचे नाव असून गत वर्षीच तिचे लग्न झाले होते. आत्महत्या केली तेव्हा लहान बाळाशिवाय घरात कोणीच नव्हते. पती लग्नानिमित्त बाहेरगावी गेला होता. घरी आल्यावर त्याला पत्नीने आत्महत्या केल्याचे दिसले. बोदवड पोलिसात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. मनुर खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.