रावेर (प्रतिनिधी):- रावेर येथे अंबिका व्यायाम शाळा आणि वाल्मीकी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य कुस्ती दंगल नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या विराट दंगलीत अनेक नामांकित पैलवानांनी आपला सहभाग नोंदवून कुस्ती शौकिनांना थरारक लढतींचा अनुभव दिला.
या कुस्ती दंगलीचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. वाल्मीकी समाज,रावेर यांनी या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवली होती, ज्यामुळे पैलवानांमध्ये अधिक उत्साह संचारला होता. यावेळी रावेर शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्यात प्रामुख्याने सुरेश धनके, पद्माकर महाजन, पीएसआय तांबे, पीएसआय महाजन, रवींद्र पाटील, पी.के. महाजन, मनोज श्रावक, अरुण शिंदे, सी.एस. पाटील, दिलीप पाटील दीपक नगरे,भास्कर महाजन, लखन महाजन इत्यादींचा समावेश होता. याशिवाय, मोठ्या संख्येने कुस्तीपटू आणि कुस्तीप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थिती लावून कुस्ती कलेला दाद दिली.