एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जयेश अशोक राजपूत असे अटक करण्यात आलेल्या मयूर कॉलनी पिंप्राळा भागातील रहिवासी चोरट्याचे नाव आहे. मोहाडी नगर, आदर्श नगर भागातील रहिवासी मुलाची सायकल २७ मे रोजी चोरी झाली होती. या चोरीप्रकरणी त्या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायकल चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे जयेश राजपूत यास ताब्यात घेण्यात आले. जयेश राजपूत याने सायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली देत चोरीच्या दोन सायकली काढून दिल्या.
पोलिस निरीक्षक संदीप भटू पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत झनके, पोलिस नाईक विकास सातदिवे, योगेश बारी, पोकॉ मंदार महाजन व ईजराईल खाटील आदींनी या तपास व कारवाईकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करत आहेत.









