मुक्ताईनगर तालुक्यात खामखेडा रस्त्यावर घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यात भरधाव पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जबर अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावर गुरुवारी रात्री घडली. यात वाहन चालकास अटक करण्यात आली आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात पुंडलिक रामकृष्ण कोळी (वय ५४) आणि भागवत महारू कोळी (वय ६२) या दोघांचा मृत्यू झाला. मयत भागवत कोळी यांना पत्नी, मुलगा आणि मुलगी तर पुंडलिक कोळी यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. भागवत कोळी हे शिंदे सेनेचे तालुका उपप्रमुख होते. मुक्ताईनगर पोलिसात लखन वसंत मोरे (रा. लोहारखेडा) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ भरधाव पिकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यात पुंडलिक कोळी आणि भागवत कोळी हे दोन जण ठार झाले. पिकअप वाहन चालक धर्मेंद्र नंदकिशोर साहू (रा.इंदूर) यास अटक करण्यात आली आहे. दोघांच्या मृत्यूमुळे नायगाव गावावर शोककळा पसरली आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.