• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पोलिसांनी घेतली सव्वा लाखांची खंडणी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पोलिसांनी घेतली सव्वा लाखांची खंडणी !

चाळीसगावात आ. मंगेश चव्हाण संतप्त, पोलीस स्टेशनला येऊन धरले अधिकाऱ्यांना धारेवर

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एका संगणक इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्को व बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख २० हजार रुपये खंडणी घेणाऱ्या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. मंगेश चव्हाण यांना घटना कळताच त्यांनी फिर्यादीसह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून तक्रार दिली आहे. तर पोलिसाच्या घर झडतीत १ लाख २० हजार हस्तगत करण्यात आले आहेत.

कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. प्रकरणाच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची सनदी दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे, अशी प्रतिक्रिया आ. चव्हाण यांनी दिली आहे. माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय
दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संगणक इन्स्टिट्यूटचे संचालक व तक्रारदार त्यांच्या क्लासमध्ये असताना दोन पोलीस आले. त्यांनी तक्रारदारांना निखिल राठोड नावाच्या व्यक्तीबद्दल विचारणा केली. राठोड त्यांच्याकडे कामाला असल्याचे तक्रारदारांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राठोडवर बलात्कारचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. तसेच, राठोडने क्लासमध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत, जागा मालक आणि त्यांचे भाऊ देखील आरोपी होऊ शकतात, असे धमकावले. तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या क्लासमध्ये अनेक विद्यार्थी येत असल्याने गैरकृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच, त्यांच्या गैरहजेरीत राठोडने कोणाला आणले याची माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारदाराला बाजूला घेऊन, ‘तू त्याला कामावर ठेवले आणि मदत केली, त्यामुळे तू सुद्धा सहआरोपी होशील’ असे धमकावले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थीचा मार्ग काढण्यासाठी पैशांची मागणी केली.

घाबरलेल्या तक्रारदारांनी पोलिसांना एक तासाचा वेळ मागितला आणि मित्रांकडून ५० हजार रुपये घेतले. रात्री ८ वाजता संपर्क साधल्यावर पोलिसांनी त्यांना कोर्टाजवळ बोलावले आणि तिथे ५० हजार रुपये घेतले. मात्र, या रकमेत काम होणार नसल्याचे सांगून आणखी पैशांची मागणी केली. आईच्या नावावर जागा असल्याने तिचे नाव गुन्ह्यात येऊ नये या भीतीने तक्रारदारांनी आणखी पैसे देण्याचे कबूल केले. त्यानंतर तक्रारदारांनी मित्रांकडून आणखी ५० हजार रुपये आणि स्वतःकडील २० हजार रुपये जमा करून पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय विद्यालयाजवळ बोलावून ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनला बोलावून नोटीसवर सही घेतली आणि दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले.

आज, १९ मे २०२५ रोजी सकाळी तक्रारदारांनी त्यांच्या मित्रांना घडलेला प्रकार सांगितला. मित्रांनी त्यांना पोलिसांविरुद्ध तक्रार करण्याचा सल्ला दिला. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केल्यावर ८०९७०१७१४३ हा मोबाईल क्रमांक अजय पाटील नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले. तक्रारदारांनी त्याचा फोटो पाहिला आणि त्यानेच पैसे घेतल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी अजय पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. चाळीसगाव शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


 

 

Tags: #aa.mangesh news #chalisgaon #jalgaon #maharashtra #bharat#chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

मतदार संघात १ लाख नवीन सभासद नोंदणीचा निर्धार, २५ रोजी शहरात तिरंगा रॅली !

Next Post

तरुणाकडे आढळल्या २ गावठी पिस्टल, निंभोरा पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाकडे आढळल्या २ गावठी पिस्टल, निंभोरा पोलिसांची कारवाई

तरुणाकडे आढळल्या २ गावठी पिस्टल, निंभोरा पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

वरणगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon