नगर विकास विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्याधिकारी लांडे यांचा सत्कार
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव नगरपरिषदेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत अंदाजे ५ कोटी रुपयांचे विविध २५ विकास कामाचे लोकार्पण व उद्घाटन दि.१० रोजी आ . किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपरिषद चौक, भडगाव येथे नगरपरिषदेकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. किशोर पाटील हे होते.
भडगाव नगरपरिषद तर्फे शहरात योजनेअंतर्गत कामे करण्यात येत आहे. भडगाव न.प.हदीतील प्रभात व्यायाम शाळेजवळ भव्य विठ्ठल मूर्ती उभारण्यात येणार आहे.तसेच १० ठिकाणी चौक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. बचत गटासाठी नगरपरिषद तर्फे आझाद चौक येथे शहरी उपजिविका केंद्र स्थापन करण्यात आले. टेक्नॉलॉजीच्या आधारे नागरिकांच्या सोयीसाठी भडगाव नगरपरिषद चॅटबॉटचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. भडगाव नगरपरिषद विद्युत विभागांतर्गत जुन्या घंटागाडीचे रूपांतर स्कायलिफ्ट तयार करण्यात आले. शहरातील दिव्यांग व्यक्तिंना निधीवाटप केले.
वरील सर्व कामांचे उद्घाटन आ.किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगर विकास विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आमदारांच्या हस्ते मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक विभागात क्रिडा रस्सीखेच स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने भडगाव नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भडगाव शहरातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच भडगांव शहरातील नागरिक उपस्थित होते.