घटस्फोटित, विधवा, विधुर, शारीरिक व्यंग असणाऱ्यांसाठी संधी
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा महाराष्ट्र सुवर्णकार सेना आणि ‘ऋणानुबंध’ वधु-वर-पालक परिचय मेळावा २०२५ समिती यांच्यावतीने घटस्फोटित, विधवा, विधुर, शारीरिक व्यंग असणाऱ्यांसाठी रविवारी, १५ जून २०२५ रोजी मातोश्री ब्लॅक्वेट हॉल (एसी) अयोध्या नगर, म्हाडा कॉलनी स्टॉपजवळ, एमआयडीसी येथे विनामूल्य परिचय मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
परिचय मेळाव्यासाठी इच्छुकांनी आपले परिचय पत्र ९८९०६८८८६४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर अंतिम तारीख १० जूनपर्यंत पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मेळाव्याच्या माध्यमातून विवाहेच्छुक वधू-वराना व्यासपीठ मिळावे याकरिता हा मेळावा असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.