जळगाव शहरात अजिंठा चौफुलीवर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : येथील गजबजलेल्या अजिंठा चौकामध्ये लोखंडी कोयता घेऊन दहशत माजवीत असताना दोन तरुणांना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश भगवान जाधव (वय ३३) आणि गणेश भगवान लोहार (वय २७, दोन्ही रा. अयोध्या नगर, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. शनिवारी दि. १० मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उमेश जाधव व गणेश लोहार हे लोखंडी कोयता घेऊन अजंठा चौफुली येथे सार्वजनिक जागी दहशत माजवताना दिसून आले. म्हणून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल शादाब अख्तर इकबाल सय्यद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे करीत आहेत.