गोदावरी एक्सलन्स पुरस्कार’ प्रदान
जळगांव ( प्रतिनिधी ) – गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन गौरवपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बी.एस्सी. नर्सिंग, जी.एन.एम. आणि ए.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा लॅम्प लाइटिंग व नाइटिंगेल शपथविधी समारंभ पार पडला. या सोहळ्याने विद्यार्थ्यांनी सेवाभावी नर्सिंग व्यवसायाची सुरुवात केली.कार्यक्रमाला प्रा. कविता नेटकर, प्राचार्य, शासकीय नर्सिंग कॉलेज, जळगाव, प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर डॉ. करिश्मा जैन, वैद्यकीय अधिकारी, नशिराबाद, विशेष अतिथी म्हणून सहभागी झाल्या. यावेळी डॉ. प्रशांत सोलंके, अधिष्ठाता, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय; डॉ. एन. एस. आर्वीकर, संचालक; डॉ. प्रेमचंद पंडित, वैद्यकीय अधीक्षक; प्रा. विशाखा गणवीर, प्राचार्य, गोदावरी नर्सिंग कॉलेज; प्रा. जसिंथ धया, उपप्राचार्य; तसेच विविध विभागप्रमुखांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर डॉ. करिश्मा जैन यांच्या हस्ते ‘गोदावरी एक्सलन्स पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने समुदायामध्ये उत्कृष्ट सेवा देणार्या परिचारिकेचा सन्मान करण्यात आला.स्वागतपर भाषणात प्रा. जसिंथ धया यांनी कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. कविता नेटकर यांनी विद्यार्थ्यांना सेवाभाव, सचोटी आणि जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. डॉ. करिश्मा जैन यांनी प्राथमिक आरोग्य सेवा क्षेत्रातील परिचारिकेच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले. डॉ. सोलंके व डॉ. आर्वीकर यांनी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कार्याची प्रशंसा केली.प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना सेवा, सहानुभूती आणि चिकाटी या मूल्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला. यावेळी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. डॉ. उल्हास पाटील यांचा विशेष संदेशही वाचून दाखवण्यात आला.या वेळी चणकड नाशिक आयोजित ‘स्पंदन २०२५’ स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. समारोपाच्या वेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.