रावेर शहरात पोलिसांनी केली कारवाई
रावेर ( प्रतिनिधी ) – बऱ्हाणपूर रोडवरील बालाजी टोल काट्याजवळ एक तरुण तलवार घेऊन दहशत माजवीत असताना आढळून आला असून, याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
येथील आकाश लक्ष्मण भील (रा. रामदेव नगर, रावेर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपी बऱ्हाणपूर रोडवरील बालाजी टोल काट्याच्या परिसरात तलवार हातात घेऊन दहशत माजवीत असल्याबाबत पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना माहिती मिळाली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल योगेश महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हमीद तडवी करत आहे.