• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतात भेटी देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर : १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतात भेटी देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर : १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका

शेतकऱ्यांनी नुकसानाचे फोटो पीक विमा कंपनीला पाठवावे, महावितरणचे पडलेले डीपी, खांब,तुटलेल्या तारा दुरुस्त करा

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ६ आणि ७ जून रोजी झालेल्या अवकाळी पावसासह वादळामुळे सुमारे ७ हजार २३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव व चोपडा तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी स्पष्ट केले की, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शासकीय मदतीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यात गट नंबर निहाय मदत पात्रतेचा स्पष्ट उल्लेख करून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. मागील वर्षी ३६० कोटींच्या मदतीपैकी ६० कोटी रुपये ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अभावी अडकल्याचे त्यांनी सांगितले. विमा कंपनीसोबतच्या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येणार असून, १०० टक्के नुकसानाची नोंद घेऊन विमा कंपनीला कळवण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले. महावितरण विभागाला तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व काय करावे-करू नये याबाबत मार्गदर्शन केले. महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथक पुढील ७२ तासांत पंचनामे पूर्ण करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी शेतकऱ्यांना १५ मेपूर्वी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात पालकमंत्री पाटील यांनी जळगाव तालुक्यातील भादली(खु.), कठोरा, किनोद, सावखेडा(खु.), करंज तसेच चोपडा तालुक्यातील धानोरा गावांचा दौरा केला. भादली (खु.) येथील शेतकरी भगवान पाटील यांच्या मुलाची केळीची बाग वादळामुळे सपाट झाल्याचे पाहून पालकमंत्रीही भावुक झाले. त्यांची वृद्ध आई हिराबाई पाटील रडायला लागल्या तेव्हा शेतकरी असलेल्या पालकमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. शासन केवळ आपली वेदना ओळखत नाही, तर थेट शेतात येऊन तुमच्या दु:खात सहभागी होत असल्याचे हे दृश्य दाखवून गेले.

दौऱ्यादरम्यान नांद्रा खु. (ता. जळगाव) येथील भागाबाई जगन पाटील या महिलेला वादळात डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्या विधवा असून सध्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीची माहिती मिळताच पालकमंत्री पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ . मारोती पोटे यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्या उपचारासाठी न्युरो सर्जनची गरज आहे, त्याला लागणाऱ्या खर्चाचे बघू म्हणून त्वरीत ऑपरेशनची तजवीज करण्याचे निर्देश दिले. या संपूर्ण दौऱ्याला शासकीय जबाबदारीसह एक भावनिक किनार लाभलेली होती.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharatशेतात भेटी देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला धीर : १२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फटका
Previous Post

शेतकऱ्यांचे नुकसान पूर्णपणे झाले : पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये

Next Post

अमरावती जिल्ह्यात सोनसाखळी हिसकावणारा भुसावळ येथील चोर अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमरावती जिल्ह्यात सोनसाखळी हिसकावणारा भुसावळ येथील चोर अटकेत

अमरावती जिल्ह्यात सोनसाखळी हिसकावणारा भुसावळ येथील चोर अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
1xbet russia

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना
1xbet russia

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी
1xbet russia

क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी

August 24, 2026
स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन
जैन कंपनी

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon