धरणगाव तालुक्यातील पष्टाने येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पष्टाने बुद्रुक येथे सोमवारी दि. २८ एप्रिल रोजी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १४ बिघा शेतातील हातातोंडाशी आलेली लाखो रुपयांची पीकं जळून खाक झाली आहेत. आग वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.
पष्टाने बु. येथील सुरेश शामराव जाधव यांच्या ४ बिघा शेतात मक्का व १ बिघा शेतात बाजरी पीक उभे होते. गुरांच्या गोठ्यात पाण्याचे टूब्स आणि शेतीसाठी आवश्यक असणारे अवजारे होती. ती सर्व आगीत जळून खाक झाली. शैलाबाई सुरेश जाधव यांचे २ बिघा शेतात मका, चुडामन शामराव जाधव यांचे ४ बिघा शेतात मक्का व गौतम लहू सोनवणे यांच्या एक बिघा शेतात मक्का अशी एकूण १४ बिघा शेतीत उभे असलेले पीक जळून खाक झाले आहे. हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास असा हिरावला गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच हरवले आहे. घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेवून आगपिडीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.