टॉन्सील विकार असलेल्या गरजू रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपक्रम
जळगाव – डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे टॉन्सीलेक्टोमी (घशातील ग्रंथी काढण्याची शस्त्रक्रिया) साठी विशेष उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
गरजू रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार करण्यात येणार आहे. डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागातर्फे आयोजित शिबीरात जे टॉन्सिलच्या त्रासामुळे दीर्घकाळ पीडित रुग्णांना अल्पदरात उच्च प्रतीच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे. शिबीरासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात विशेष शस्त्रक्रिया विभाग उभारण्यात आला असून, तेथे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच तपासणीसाठी नाक-कान-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ. सृष्टी पाटील,डॉ. जान्हवी बनकर, डॉ. चारू सोनवणे, डॉ. सायकत बासू, डॉ. रितु रावल, डॉ. अंकीता सोलंकी अशी टीम कार्यरत आहे.
हृदयविकार किंवा इतर गंभीर आजार असलेले रुग्ण ज्यांची शस्त्रक्रिया अति जोखमीची आहे, अशा केसेसची वेगळी तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी लवकरात लवकर ग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाक-कान-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी केले आहे