भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील यशवंत नगरातील कंडारी गावात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा हात फ्रॅक्चर होवून दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी १६ एप्रिल रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी नंदा अशोक जाधव (वय ४५ रा. कंडारी, ता.भुसावळ) ह्या जखमी झाल्या आहेत. दि. १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावात राहणारे त्यांचे नातेवाईक यांच्यात आपापसात भांडण सुरू होते. त्यावेळी सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी नंदा जाधव पुढे गेल्या. त्यावेळी वसुबाई सुर्यवंशी (रा.अमळनेर) या महिलेने नंदा जाधव यांचा हात मुरगळला. त्यामुळे त्यांच्या हात फ्रॅक्चर झाला आहे. जखमी झालेल्या नंदा जाधव यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी १६ एप्रिल रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वसुबाई सुर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संजय सोनवणे हे करीत आहे.