सुमीरा गांधी परिवारातर्फे हमालांना बागायती रुमाल वाटप
जळगाव (प्रतिनिधी) : रामनवमीचे मुहूर्त साधूनश्री जैन युवा फाउंडेशन आयोजित सुमिरा गांधी परिवार प्रायोजित भवानी पेठेत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हमाल बांधवाना बागायती रुमाल वाटप करून त्यांना उन्हाळ्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उद्योजक महेन्द्र गांधी, संजय गांधी, जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणव मेहता, खजिनदार दिनेश बाफना, रिकेश गांधी, प्रकल्प प्रमुख जिनेश सोगठी, पियूष संघवी यावेळी उपस्थित होते. प्रसंगी हमाल बंधू अरुण नाथ यांचे हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या पाणपोईसाठी सुमिरा गांधी परिवारतर्फे ५१ हमाल बंधूंना उन्हापासून संरक्षण म्हणून बागायती रुमाल वाटप करण्यात आले. याशिवाय गणेश कॉलनी रस्त्यावर मित्र कॉलनीत हितेश शाह, मितेश शाह यांचे पुढाकाराने पुष्पांबेन शाह यांचे हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कच्छकेसरी फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश पोलडीया उपस्थित होते.