चाळीसगाव तालुक्यात ऋषींपांथा येथे जमले विद्यार्थी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील वाडे येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ऋषींपांथा ता. चाळीसगाव या ठिकाणी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी एस.एस. पाटील, एस.आर. महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. सध्या ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे याबाबत माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी इयत्ता दहावीच्या बॅचचे सन १९९६-९७ चे शिक्षक अहिरराव, भोसले, माळी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित शिक्षकांचा सत्कार करून आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील निंबा पाटील यांनी केले.
या कार्यक्रमात भीमसिंग परदेशीं, जयसिंग परदेशीं, रवींद्र महाजन, विजय महाजन, कोमलसिंग परदेशीं, भरत चौधरी, शरीफ खाटीक, कैलास माळी, योगेश निकुंभ, जगतसिंग परदेशीं, दत्तात्रय चौधरी, संजय परदेशी, सुधाकर पवार, गिरीश महाजन, सुभाष पाटील, विकास पाटील, निर्मला पाटील, गिनाबाई महाजन, सुनीता महाजन, सोनाली अमृतकार, उषा माळी, मनीषा पाटील, जनाबाई चौधरी, भूषण चौधरी, साहेबराव माळी, तुकाराम माळी, वंदना महाजन आदी विद्यार्थी हजर होते. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.