धरणगाव येथे दुर्दम्य प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिका लोकार्पण
धरणगाव ( प्रतिनिधी ) – समाजाची उन्नती आणि मानवतेची खरी ओळख सेवाभावातून प्रकट होते, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथे गुढीपाडव्याच्या दिवशी दुर्दम्य प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका लोकार्पणप्रसंगी केले.
व्यासपीठावर आ. सुरेश दामू भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, प्रा. आर. एन. महाजन, प्रा. डी. आर. पाटील, डॉ. मिलिंद डहाळे, सुभाष पाटील, डी.जी. पाटील, पी. सी. पाटील, सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. ना. गुलाबराव पाटील म्हणाले, परोपकार, दुसऱ्यांची मदत करणे आणि निःस्वार्थीपणे सेवा करणे हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ कर्तव्य आहे.
प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय शिंगाणे यांनी केले. या वेळी आमदार भोळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि वेळेवर मदत मिळाली तर जीव वाचवता येतो.’ ह.भ.प. जळकेकर महाराज मनोगतात म्हणाले की, समाजाची आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. प्रा. महाजन तसेच डॉ. मिलिंद व्हाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. दुर्दम्य प्रतिष्ठानच्या अत्याधुनिक रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या कामाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी दुर्दम्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास माळी, उपाध्यक्ष संतोष सोनवणे सचिव मंदार चौधरी, प्रा. डॉ. संजय शिंगाणे, सुधाकर वाणी, योगेश म हाजन, परेश काळे, दीपक चौधरी, कैलास वाघ, अजिंक्य जोशी, आनंद फुलपगार, आर्यन सैंदाणे, वेदांत भट यांनी परिश्रम घेतले. आभार योगेश महाजन यांनी मानले. सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले.