जळगाव शहरातील नूतन वर्षा कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : अपार्टमेंटमध्ये जिन्याखालील बाजूस असलेल्या सेफ्टीडोअरचे कुलूप तोडून इन्व्हर्टरच्या २ बॅटऱ्या चोरट्यांनी चोरुन नेल्या. ही घटना दि. ९ व १५ मार्च दरम्यान मोहाडी रोडवरील नूतन वर्षा कॉलनीत घडली. याप्रकरणी २७ मार्च रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहाडी रस्त्यावरील नूतन वर्षा कॉलनीत चार मजली अपार्टमेंटमध्ये दि. ९ मार्च रोजी अज्ञात इसम शिरले. त्यांनी १९ हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरुन नेली. त्यानंतर पुन्हा दि. १५ मार्च रोजी चोरट्याने २१ हजार रुपयांची दुसरी बॅटरीदेखील चोरुन नेली. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्या फुटेजवरुन बॅटरी चोरुन ती बॅटरी चारचाकी वाहनातून घेवून जाणाऱ्या चौघांना पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेतले. ते चौघ उच्चशिक्षीत असून त्यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत हे करीत आहे.








