• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटी अनुदान मंजूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2025
in जळगाव, महाराष्ट्र
0
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटी अनुदान मंजूर

पाचोरा-भडगावचे आ. किशोर पाटील यांची माहिती

पाचोरा (प्रतिनिधी) : सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनातर्फे पाचोरा भडगाव मतदार संघातील ८६ हजार ७३३ शेतकर्‍यांना सुमारे १०० कोटी रूपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर हा निधी पडणार आहे. येणारा गुढी पाडवा हा या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांंना गोड जाणार असल्याची माहीती आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपाचे मधुकर काटे, सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, किशोर बारवकर, सुनिल पाटील, गंगाराम पाटील, राजेंद्र पाटील, प्रविण ब्राम्हणे, संजय सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. किशोर पाटील म्हणाले की, राज्यात आपत्ती निधीच्या नियमानुसार, पाचोरा तालुक्यातील ६६. ७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ५२ हजार ३६४ शेतकऱ्यांना एकूण ६९ कोटी ४५ लाख २२ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर भडगाव तालुक्यातील २२ हजार १००. १५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ३४ हजार ३६९ शेतकऱ्यांना एकूण ३० कोटी ५ लाख ६२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

शेतकर्‍यांना हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी. बी. टी. पोर्टलद्वारे वितरित केले जाणार आहे. यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शेतकऱ्यांची बँकनिहाय व आधार क्रमांकानुसार यादी तयार करत आहेत. अनुदान मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी “आपले सरकार” केंद्रात जाऊन तत्काळ ई – केवायसी करावी, जेणेकरून निधी त्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल. शासनाने शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला असून सर्व लाभार्थ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभारही आ. किशोर पाटील यांनी मानले.


 

 

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

सौर ऊर्जा व निसर्ग ऊर्जा परिषदेसंदर्भात बैठक संपन्न

Next Post

खराब रस्त्यांमुळे दुचाकीवरून पडल्याने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खराब रस्त्यांमुळे दुचाकीवरून पडल्याने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

खराब रस्त्यांमुळे दुचाकीवरून पडल्याने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon