जळगाव शहरातील पिंप्राळा येथील घटना
दिलीप कन्यालाल रामचंदानी (वय ५२ रा. जिल्हा बँक कॉलनी, पिंप्राळा) हे परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे पिंप्राळ परिसरातील सोमाणी मार्केट जवळशिवम दूध डेरी दुकान आहे. रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांच्या दुकानावर गंप्या आणि पप्पू नावाची दोन व्यक्ती येऊन त्यांनी काही कारण नसताना दुकानदार दिलीप रामचंदानी यांना शिवीगाळ करत दुकानातील कोल्ड्रिंगची भरलेली काचेची बाटली डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर दिलीप रामचंदानी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहे.