पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. ता. जळगाव येथे जागतिक महिला दिनच्या शुभ मुहूर्तवर पहिली शिवसेना तसेच युवासेना महिला पहिली शाखा उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, महिला सक्षमीकरण तसेच महिलांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.
यावेळी फलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी माजी जि. प. सदस्य पवन सोनवणे, धोंडू जगताप, संपर्क प्रमुख श्याम कोगटा, माजी पं. स. सभापती नंदु पाटील, युवा सेना तालुका प्रमुख रामकृष्ण काटोले, शिवदास बारी, प्रवीण बारी, प्रशांत काटोले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवासेना अध्यक्ष रुपाली ताडे, अर्चना ताडे, प्रीती खलसे आणि ७५ महिला भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले.