जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती
रावेर (प्रतिनिधी) : रावेर-यावल तालुक्यातील कोळी समाजातील विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी (उपवर-वधुंसाठी) दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संपूर्ण मोफत सामुहिक विवाह संस्कार सोहळ्याचे आयोजन जळगाव येथे दि. ४ मे रोजी रेल्वे स्टेशन शेजारी घेण्यात येणार आहे. हा सोहळा यशस्वीतेसाठी तालुका नियोजन बैठक घेण्याचे दि. ९ मार्च रोजी फैजपूर येथे घेण्यात येणार आहे.
पुढील काळात सुध्दा समाजाच्या न्याय व हक्कांसाठी पुन्हा लढा उभारणेबाबत नियोजन करावे लागणार आहे. बैठकीस जळगाव येथील मंडळ पदाधिकारी मार्गदर्शक जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच फैजपूर येथील खंडेराव वाडी येथील परमपूज्य महामंडलेश्वर श्री पवनदासजी महाराज, राम राज्य ग्रुप पदाधिकाऱ्यांचा व जळगाव येथील पदाधिकाऱ्यांचा कोळी समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तरी समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन यावल तालुका अध्यक्ष दिलीप कोळी, रावेर तालुका अध्यक्ष गंभीर उन्हाळे यांनी केले आहे.