• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाचा खून करून दाखविला अपघाती मृत्यू : विम्याचे ९८ लाख लाटल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाचा खून करून दाखविला अपघाती मृत्यू : विम्याचे ९८ लाख लाटल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल !

मयत जळगावच्या पिंप्राळ्यातील रहिवासी, वरणगावजवळ घडविली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : कोमात असलेल्या जळगावच्या तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणी फाट्याजवळील साईबाबा मंदिराजवळ खून करून दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचे दाखवून संशयित आरोपींची यानंतर विम्याचे ८३ लाख आणि दुचाकीच्या विम्यावरून १५ लाख असे ९८ लाख रुपये लाटल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी जळगाव येथील दोघे व एरंडोल येथील एक अशा ३ जणांना अटक करण्यात आली. मृताच्या चुलत बहिणीने नाशिक आयजींकडे तक्रार केल्यानंतर हा उघडकीस आला. यानंतर तिघांवर खुनाच्या गुन्ह्याचे कलमदेखील वाढवण्यात आले.

शरद किसन जगताप (वय ३८, रा. संत मीराबाई नगर, पिंप्राळा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मृत शरदच्या चुलतबहिणीने याप्रकरणी नाशिक येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी या प्रकरणात चौकशी केली. (केसीएन)शरद किसन जगताप हे आजारी पडून कोमामध्ये गेले. यावेळी संशयित आरोपी राजू सुभाष गुजारे (वय ४५, रा. न्यू लक्ष्मीनगर, मेहरुण) याने शरद जगताप यांच्या नातेवाइकांना विमा क्लेम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी शरद यांचा दि. २८ मे २०२३ रोजी भुसावळ तालुक्यातील आयुध निर्माणीजवळील साईबाबा मंदिरालगत राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघात झाल्याचे दाखवले.

जळगावचा योगेश वाणी या रुग्णवाहिका चालकाने पोलिसांना मुक्ताईनगरकडून भुसावळकडे येताना रस्त्यात अपघात झाल्याचे दिसले. त्यात जखमी तरुणाला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्याचा जबाब दिला. पण, तो खोटे बोलत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने आपण मुक्ताईनगरहून रुग्णवाहिका घेऊन येत असल्याची बतावणी केली. या अपघातप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात खोटी फिर्याद देणारा घनःशाम अमृत सपकाळे (वय २७, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल), जळगाव येथील रुग्णवाहिका चालक योगेश प्रकाश वाणी (वय ३०, रा.गणेशवाडी, जळगाव) यांनी मदत केली.

यानंतर जगताप यांचा १ कोटी रुपयांचा इन्शुरन्स क्लेम करून ८३ लाख व दुचाकी विम्याचे १५ लाख मिळवले. ही रक्कम मृताच्या पत्नीच्या बँक खात्यावर जमा झाली. पण हे बँक खाते आणि त्याला लिंक असलेला मोबाइल क्रमांक पण राजू गुजारे हा हाताळत होता, असे तपासात समोर आले.(केसीएन)याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी ४ मार्चला राजू सुभाष गुजारे, तर ५ मार्चला घनश्याम अमृत सपकाळे व योगेश प्रकाश वाणी यांना अटक केली. तिघांना भुसावळ न्यायालय हजर केल्यावर पाच दिवसांची दि. ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास वरणगावचे एपीआय जनार्दन खंडेराव, हवालदार एस.जे.सावकारे, मनोहर बनसोडे करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भरधाव डंपरने सायकलस्वाराला चिरडले, वृद्धाचा जागीच मृत्यू

Next Post

जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटक आठवडाभर बंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटक आठवडाभर बंद

जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे फाटक आठवडाभर बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon