• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकाला मध्यप्रदेशातून तर दुसऱ्याला मुक्ताईनगरातून अटक, ५१ सीसीटीव्ही तपासले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एकाला मध्यप्रदेशातून तर दुसऱ्याला मुक्ताईनगरातून अटक, ५१ सीसीटीव्ही तपासले !

शहरातील घरफोडीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत आरोपींना अटक केली आहे. तब्बल ५१ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर व तांत्रिक विश्लेषण केल्यावर दोघं संशयित आरोपीना गजाआड करण्यात आले आहे. तर आणखी एका चोरीप्रकरणी विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरेश हिराराम सोलंकी (रा. सावीत्रीनगर, जळगाव) हे लग्नसमारंभासाठी राजस्थानला गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातील १ लाख ६० हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू व ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे शोध पथकाने ५१ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित आरोपी म्हणून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचे नाव समोर आले.(केसीएन)त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर तो श्री ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला एका लॉजमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार दिपक राजू पाटील (वय २३, रा. तांबापुर, जळगाव) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी मुक्ताईनगर येथे जाऊन दिपक पाटीललाही अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या १ लाख १५ रुपयांच्या चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात, गणेशपुरी मेहरुण, जळगाव येथे राहणारे मोहसीन खान अजमल खान यांच्या घरातून २३ हजार ३०० रुपये चोरीला गेले होते. पोलीस कर्मचारी रतन गीते, राहुल घेटे, नितीन ठाकूर यांनी तपास करत मास्टर कॉलनीतील एका विधीसंघर्ष बालकाचा शोध घेतला.(केसीएन)त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गौरव पाटील, मिलिंद जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तपासात मोलाची भूमिका बजावली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पोलिस कुटुंबीयांसाठी शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Next Post

नेक्रोटायझिंग पॅनक्रियाटायटीसच्या आजारावर यशस्वी उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नेक्रोटायझिंग पॅनक्रियाटायटीसच्या आजारावर यशस्वी उपचार

नेक्रोटायझिंग पॅनक्रियाटायटीसच्या आजारावर यशस्वी उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त
1xbet russia

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026
नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?
1xbet russia

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
जैन कंपनी

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार
1xbet russia

टीम व्ह्यूअस्त्रचे रोबोटिक्स स्पर्धेत गोदावरी आयएमआरचे यश

August 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026
नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon