• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रविणऋषीजी यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2025
in जैन कंपनी, जळगाव, भारत, मुंबई
0
प्रविणऋषीजी यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

भव्य शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांचा लक्षवेधी सहभाग

जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘अर्हम विज्जा’चे प्रणेते, श्रमण संघीय उपाध्याय प्रवर, ओजस्वी वक्ता श्री प्रविणऋषीजी महाराज साहेब व मधुरगायक, सेवाभावी तीर्थेशऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासा निमित्त गणपतीनगर स्थित स्वाध्याय भवन येथे मंगल प्रवेश झाला. जळगावकरांच्या प्रेमापोटी ‘वर्षी-तप’ सारखी कठीण तपश्चर्या सुरू असताना ७०० किलोमिटरची पदयात्रा विहार करीत श्री. प्रविणऋषीजी म.सा. जळगावात पोहचले. दोन्ही संतांच्या स्वागतासाठी निघालेल्या भव्य शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

जैन हिल्स येथून आज सकाळी प्रविणऋषीजी म. सा. व श्री. तीर्थेशऋषीजी म. सा. यांनी पायी विहारास सुरवात केली. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन होते. भाऊंचे उद्यान काव्यरत्नावली चौक येथून समाजबांधवांनी गुरूभगवंतांच्या स्वागतासाठी आकर्षक शोभायात्रेचे आयोजन केले होते.

याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, संघहितैषी प्रदीप रायसोनी, मंत्री अनिल कोठारी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२५ चे अध्यक्ष राजकुमार सेठिया, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, दादावाडी विश्वस्त प्रदीप मुथा, जयमल संघाचे स्वरूप लुंकड, पारस राका, साधूमार्गी संघाचे मोतीलाल मुणोत, विनोद मल्हारा, रत्नसंघाचे सुनील बाफना व अमर जैन तसेच पदाधिकारी यांच्यासह जय आनंद ग्रुप, युवाचार्य ग्रुप, श्रमण महिला मंडळ, आदी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

‘अहिंसा परमो धर्म’चा दिला संदेश

भाऊंच्या उद्यानाजवळील काव्यरत्नावली चौकातून उत्साहात निघालेली शोभायात्रा ही जैन धर्मनाथ मंदीर, अल्पबचत निवास मार्गे स्वाध्याय भवन येथे पोहचली. कलशधारी कन्या, अष्टमंगल, अर्हम विज्जा त्यात ‘आत्मा में परमात्मा की अनुभूती कराने की कला, श्रेष्ठत्व जीवन का निर्माण, मातृत्व एवं पितृत्व को दिव्य अनुभूती के साथ जीना’ असे सामाजिक संदेश दिले होते. आनंद ओवी, जैन ध्वजद्वारे ‘अहिंसा परमो धर्म’ हेच मनुष्य कल्याणाचे साधन असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश-घोषणा शोभायात्रेतून दिल्या गेल्या.

स्वाध्याय भवन प्रांगणात आल्यावर श्रावक-श्राविकांनी अष्टमंगल व अष्टप्रतिहार्य व जैन ध्वज ऊंचावून गुरूमहाराजांचे भावस्पर्शी स्वागत केले. जैन युवा फाऊंडेशन तर्फे स्वागतपर भक्तीनृत्य तर श्रमण संघ महिला मंडळाच्या वतीने स्वागत गीताने गुरुमहाराजांचे मनोभावे स्वागत केले गेले. कस्तुरचंद बाफना यांनी मनोगतातून काव्यमय प्रस्तूती केली.

प्रविणऋषीजी म.सा. यांनी आशीर्वादपर मनोगतात ‘जळगावमध्ये आधी दोन वेळा विहार मार्गात असल्याने आलो. पहिल्यांदाच जळगावकरांच्या विशेष विनंतीवरून ७०० किलोमिटरची पदयात्रा करुन आलो. स्वर्णनगरी म्हणून ओळख असलेले जळगाव, धर्मनगरी म्हणूनही प्रसिद्ध असल्याची प्रचिती ठिक-ठिकाणी लागलेल्या बोर्डवरून आली. जळगावकरांची धर्माप्रती असलेली दृढ आस्था, उत्साह पाहून खूप आनंद झाला. आमचे याठिकाणी येणे सार्थकी झाले.’ जैन दर्शनमध्ये चार प्रकाराचे ध्यान सांगितले आहे. यातील ‘धर्मध्यान’ आपल्या जीवनात कसे आचरण करावे याबाबत सखोल विवेचन पुढील १५ दिवस प्रवचनात केले जाणार आहे. अनिल कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे नवकारशीची व्यवस्था करण्यात आली होती.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraप्रविणऋषीजी यांचा होळी चार्तुमासानिमित्त 'स्वाध्याय भवन' येथे मंगल प्रवेश
Previous Post

गोदावरी नर्सिंग मध्ये संवाद कौशल्य विकास व्याख्यान व चर्चासत्र उत्साहात

Next Post

रिक्षाने दिलेल्या भीषण धडकेत वृद्ध पुजारी ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रिक्षाने दिलेल्या भीषण धडकेत वृद्ध पुजारी ठार

रिक्षाने दिलेल्या भीषण धडकेत वृद्ध पुजारी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon