भुसावळ – येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील यांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. यानंतर शाळा परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवकालीन देखावा नाटिकेच्या माध्यमातून साकारण्यात आला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी या घोषणेने परिसर दणादणला होता. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षीका उपस्थित होत्या.