रावेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना होणार लाभ
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगावतर्फे स्टार्ट व समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक यांचे प्रशिक्षण रावेर तालुक्यातील विवरा येथील ग. गो. बेंडाळे हायस्कूल येथे सुरुवात करण्यात आली.
तीन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण होणार असून पहिला टप्प्याची सुरुवात दि. ११ ते १५ फेब्रुवारी तसेच ८ मार्च पर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी एकूण माध्यमिक ८३० शिक्षक शिक्षिका तसेच प्राथमिक ५९६ शिक्षक शिक्षिका हे प्रशिक्षण घेणार आहेत. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ४०० लोक प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणासाठी रावेर गटशिक्षणाधिकारी विकास कोळी तसेच प्रशिक्षक समन्वयक म्हणून पी.आर. मानकर काम पाहत आहे. शिक्षक शिक्षिका यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध रहावे असे गटशिक्षणाधिकारी विलास कोळी व समन्वयक पी. आर. मानकर यांनी सांगीतले आहे.