यावल तालुक्यातील वडोदा गावाजवळ घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडोदा गावाजवळ चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. चारचाकी दुचाकीवर जाऊन धडकल्याने दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी साकळी येथून डिझेल घेण्यासाठी पेट्रोलपंपावर जात असताना हा अपघात घडला. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचे नाव करण विजय जंजाळे (२४, रा.आंबेडकर नगर, साकळी ता.यावल) असे आहे. करण जंजाळे दुचाकीने क्रमांक (एम. एच. १९ डी. क्यू १७०९) यावलकडे येत होता. यावलकडून चोपड्याकडे जाणाऱ्या चारचाकीचे क्रमांक (एम. एच. १९ ए. पी. ३२७३) टायर यात अचानक फुटले. चालकाचे नियंत्रण कार जाऊन सुटल्याने दुचाकीवर धडकली. यात दुचाकीवरील तरुण नाल्यात पुलाखाली कोसळला. कारच्या धडकेत दुचाकीचे हॅन्डल तरुणाच्या छातीत घुसल्याने जागीच ठार झाला. नातेवाईकांना मोठा आक्रोश केला.
अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावल पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. अपघातानंतर कार चालक कार सोडून फरार झाला. याप्रकरणी यावल पोलिसात मिलिंद जंजाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.