सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व आजारांवर होईल मोफत उपचार
जळगाव — माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचा २३ फेबु्रवारी वाढदिवसानिमीत्त आजपासून विनामुल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व आजारांवर मोफत उपचार होणार आहे.
शिबिरात हर्निया, अपेन्डीक्स, डायबेटीक फुट, न भरणा—या जळमा, व्हेरीकोज व्हेन्स,मुतखडा, पित्ताशय खडा, कान,नाक घसा, कर्करोग, मेंदू व मणका, अस्थीरोग आणि बालकांमधील हर्निया,,अंडाशयातील गाठी व व्यंग तसेच स्त्रीरोग शस्त्रक्रिया गर्भपिशवी आणि अंडाशयाच्या गाठी या मोफत केल्या जाणार आहे. याचबरोबर एन्जीओग्राफी,एन्जीओप्लास्टी,लकवा, पॅरालेसिस, किडनीविकार,मधुमेह,उच्चरक्तदाब,श्वसन व छातीचे विकार, दारूमूळे झालेले लिव्हर,पोटाचे व अन्न नलिकेचे आजार,त्वचविकार, बालविकार, यासह मानसोपचारावर मोफत उपचार केले जाणार आहे. हे शिबिर ८ ते २३ फेबु्रवारी पर्यत सूरू राहणार असून तपासणीस आलेल्या रूग्णांना सवलतीत चाचण्या केल्या जाणार आहे तर अॅडमिट रूग्णांना सर्व प्रकारची औषधी व तपासण्या मोफत केल्या जाणार आहे. यासाठी फक्त आधार व रेशनकार्ड सोबत आणायचे आहे.
अशी आहे तज्ञांची टीम
जूरल शस्त्रक्रियेसाठी प्रख्यात सर्जन डॉ. शिवाजी सादुलवाड, डॉ.चैतन्य पाटील, डॉ. अर्शिल शेख, मुत्ररोग, बालरोग,दुर्बिण व लेझर व्दारे शस्त्रक्रियेसाठी या वर्षात १०००० च्या शस्त्रक्रियेचा विक्रम करणारे डॉ. मिलींद जोशी, डॉ.वैभव फरके, डॉ किरण, डॉ ॠषिकेष,कान,नाक घसा तज्ञ डॉ अनुश्री अग्रवाल,डॉ.जान्हवी, डॉ बासू, स्त्रीरोग विभाग डॉ. माया आर्विकर, डॉ. मृदुला, मेदु व मणका विभाग डॉ. विपुल राठोड,डॉ.अर्शिल, कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे, डॉ. श्वेता, अस्थीरोग तज्ञ डॉ. दिपक अग्रवाल, डॉ. प्रमोद सारकेलवाड, डॉ अंकीत, डॉ.शुभम, तर हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. हार्दीक मोरे, डॉ.उमेश, जनरल मेडीसिन तज्ञ डॉ चंद्रया कांते, डॉ पूजा तन्नीरवार, डॉ. सी डी सारंग, डॉ विनोद बाविस्कर, डॉ रिषभ,त्वचाविकार तज्ञ डॉ. पंकज तळेले,डॉ तेजस्वीनी, मानसोपाचर तज्ञ डॉ विलास चव्हाण,डॉ. उमा,बालरोग तज्ञ डॉ उमाकांत अणेकर, डॉ सुयोग तन्नीरवार, डॉ ओमश्री, इ तपासणी व उपचार करणार आहे. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी तपासणी व उपचार करून घ्यावे असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.