जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील माळपिंप्री गावाजवळ भरदार ट्रकने बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल श्रीराम गायकवाड (वय २५ रा. पाळधी ता.जामनेर) असे मयत चालकाचे नाव आहे. परिवारासह तो गावात राहत होता. स्वप्निल गायकवाड हा २७ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास बोलेरो पिकप क्रमांक (एमएच ०४ एचएस ६८६७) ने येत असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक (एमएच ४८ जेझिरो ०१०५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरो वाहनामधील चालक स्वप्निल गायकवाड हा जागीच ठार झाला, तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालक सुनील हिरालाल सोनवणे (रा. खोटेनगर, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उमेश चौधरी करीत आहे.