• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी करार शेती महत्त्वाची – मिलन चौधरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2025
in जैन कंपनी, Uncategorized, जळगाव, भारत
0
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी करार शेती महत्त्वाची – मिलन चौधरी

जळके येथे टोमॅटो पीक परिसंवादात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) – कागोमी टोमॅटोचे वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत. जैन इरिगेशन आणि कागोमी कंपनी ४ वर्षांपासून संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी काम करत आले आहे. शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे मिळावे हीच तळमळ प्रत्येक सहकाऱ्याची आहे. टोमॅटो करार शेती उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कागोमीचे भारतातील प्रमुख मिलन चौधरी यांनी केले. जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड आणि कागोमे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व जळके येथील गजानन ठिबक यांच्या संयुक्त विद्यमाने टोमॅटो पीक परिसंवाद आयोजला होता त्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी शरद पाटील, कृषी मंडल अधिकारी मिलिंद वाल्हे, कागोमीचे सहकारी संदीप जाधव, मनोहर देसले, जैन इरिगेशनचे करार शेती प्रमुख गौतम देसर्डा, श्रीराम पाटील, विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे, एस.एन. पाटील, गजानन ठिबक जळकेचे संचालक पी.के. पाटील त्याच प्रमाणे सुधाकर येवले व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास पंक्रोशीतील सुमारे ४०० शेतकरी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे वितरक असलेले पी.के. पाटील हे वडिलोपार्जित शेती देखील करतात. उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते आपली शेती करतात. गत चार वर्षांपासून ते टोमॅटोची लागवड करून भरघोस उत्पादन घेत आहेत. इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वप्रथम शेतकऱ्यांची शिवार फेरी झाली. टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जाऊन लागवडीची पद्धत, मल्चिंगचा तसेच आत इनलाईन ठिबक सिंचनाचा केलेला वापर इत्यादीचे अवलोकन शेतकऱ्यांनी केले. श्रीराम पाटील व करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुढच्या वर्षी टोमॅटोची लागवड करायची असेल तर आदल्या वर्षापासूनच तयारी करणे श्रेयस्कर होते.

जैन इरिगेशनची टोमॅटो, पांढरा कांदा आणि हळद याची करार शेती प्रकल्पाची संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. हळदीची देखील शेतकऱ्यांनी लागवड करावी. दहा महिन्यांमध्ये क्विंटल नव्हे तर टनामध्ये हळदीचे उत्पादन घेता येते त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो असे सांगून हळद लागवड करावी असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक गजानन ठिबकचे संचालक पी के पाटील यांनी टोमॅटो लागवडीचे आपले अनुभव सांगितले. त्यात ते म्हणाले की, गेल्यावर्षी त्यांना ५८ मेट्रीक टन टोमॅटोचे उत्पादन मिळाले होते. या वर्षाची पीक परिस्थिती पाहिली असता ६० टनांहून अधिक टॉमॅटोचे उत्पादन अपेक्षीत असल्याचे ते म्हणाले. टोमॅटोचे पीक फायद्याचे कसे ठरते याबाबत सविस्तर सांगण्यात आले.

कामोमी कंपनीचे करार शेती विभागाचे सहकारी मनोहर देसले यांनी या परिसंवादात टोमॅटोची लागवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत माहितीत सांगितली. शाश्वत शेती करायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. पारंपरिक पद्धतीने केलेली शेती परवडणारी ठरत नाही. पिकाची निवड, पीक पद्धती, फर्टिगेशन, ऑटोमेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी महाराष्ट्र विपणण प्रमुख एस.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शरद पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. या योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकेल. याविषयी परिसंवादात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. सोळुंके व आभारप्रदर्शन श्रीराम पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.

 


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraशेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी करार शेती महत्त्वाची - मिलन चौधरी
Previous Post

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

जिल्हा परिषद मराठी शाळा, पाडळसे येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा परिषद मराठी शाळा, पाडळसे येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम

जिल्हा परिषद मराठी शाळा, पाडळसे येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon