जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने शहरातील पदाधिकाऱ्यांनी जळगाव महापालिकेसमोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपूरे, महिला आघाडीच्या मंगला बारी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयाकडून जामीन मिळावा यासाठी संजय राऊत यांनी अनेक वेळा अर्ज केला होता. परंतू प्रत्येकवेळी त्यांचा जामीन नाकारण्यात येत होता. बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता संजय राऊत यांच्या जामीनावर न्यायालयात कामकाज झाले असता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. या अनुषंगाने जळगाव महापालिकेच्या समोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्यांनी फूगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला आहे.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपूरे, महिला आघाडीच्या मंगला बारी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.