जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेचे रेल्वे व्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भुसावळ विभागातील पांच तिकीट तपासणी कर्मचारी आणि मुख्य वाणिज्य निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभात मध्य रेल्वेचे सर्व प्रमुख अधिकारी आणि सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या समारंभात ऑनलाइन उपस्थित होते. भुसावळ मंडळाचे तिकीट तपासणी कर्मचारी के के पटेल, विनय ओझा, गुड्डू कुमार, आर के गुप्ता आणि वंदना ढोमने यांचा सत्कार करण्यात आला. भुसावळ विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक तरुण बिरिया यांना मध्य रेल्वेचे व्यवस्थापक नरेश ललवाणी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मध्य रेल्वेचे एकून ५ मुख्य वाणिज्य निरीक्षक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.